Chikhali : गॅस लिकेज झाल्याने कारला आग

एमपीसी न्यूज – सीएनजी गॅसवर चालणा-या कारमध्ये गॅस लिकेज झाल्याने आग लागली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास कुदळवाडी उड्डाणपूलाखाली घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फियाट कार कुदळवाडी पुलाखालून कुदळवाडी कडून चिंचवडच्या दिशेने जात होती. कुदळवाडी पुलाखाली कार आली असता कारमधील गॅस लिकेज झाल्याने कारने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली. दरम्यान आग वाढल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन विभागास माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.