PimpleSaudagar : रहाटणीतील सराफ दुकानदारावर गोळीबार; अडीच किलो सोन्याचे दागिने लुटले

पोलीस घटनास्थळी दाखल, आरोपीचा शोध सुरु

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील एका सराफ व्यावसायिकावर गोळीबार झाला. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास कोकणे चौक येथे घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. यात सुमारे अडीच किलो अर्थात 62 लाख 50 हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले.

दिव्यांग प्रदीप मेहता (वय 24, रा. रहाटणी) असे जखमी व्यवसायिकाचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणीमधील कोकणे चौकाजवळ पुणेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. दुपारी एकच्या सुमारास दोघेजण दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतल्या बाजूने बंद केले. त्यांनी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डिव्हीआर काढून नेला.

यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी गोळीबार केला. यामध्ये दिव्यांग यांच्या पायाला गोळी लागली. चोरट्यांनी दुकानात लावलेले आणि दुकानातील तिजोरीत ठेवलेले सुमारे अडीज किलो अर्थात 62 लाख 50 हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले. दुकानात आलेल्या आरोपींसोबत आणखी आरोपी असल्याची शक्यता आहे.

  • जखमी दिव्यांग यांना स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.