Pune/Pimpri : स्वच्छता सर्वेक्षणात शहराचा ‘कचरा’; पुणे 37 व्या, तर पिंपरी चिंचवड 57 व्या क्रमांकावर

केंद्र सरकारचे सर्वेक्षण; आज निकाल जाहीर

एमपीसी न्यूज- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात इंदोर यंदा देखील पाहिल्या स्थानावर आहे. तर, यामध्ये गतवर्षी 10 व्या स्थानावर असलेले पुणे शहर यंदा 37 व्या स्थानावर गेले तर, पिंपरी-चिंचवड 57 व्या स्थानी आहे. तर मागीलवर्षी पुण्याचा 10 वा क्रमांक होता.  त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरली असल्याचे आकडेवारीवरुन माहिती पुढे आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा कचरा होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा आज (बुधवारी) निकाल जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातुन देशभरात मागील चार वर्षाच्या काळात स्वच्छता मोहिम हाती घेतली. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सलग तिसऱ्या वर्षी इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.

  • पुण्याचा यंदा 37 व्या स्थानावर पोहोचले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहर 57 व्या स्थानावर आहे. या मानांकनामुळे दोन्ही शहरे स्वच्छतेबाबत मागे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा 52 वा क्रमांक आला आहे. 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहराचा देशात 43 वा तर, राज्यात 6 व्या क्रमांकांवर होता. त्यामध्ये यंदा घसरण झाली आहे. देशात 52 तर, राज्यात 13 वा क्रमांक आला आहे.

व्यापक स्वरुपात नागरिकांचा आणि समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे तसेच याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. पिंपरी-चिंचवड शहरात 4 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान राबविण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. परंतु, निकालात शहराची घसरण झाली आहे.

  • 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. तर, गतवर्षी त्यामध्ये सुधारणा होऊन देशात 43 वा क्रमांक आला होता. तर, राज्यात 6 व्या क्रमांकावर होतो. यावेळी पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 52 वा तर, राज्यात 13 वा क्रमांक आला आहे. पुण्याचा 37 वा क्रमांक आहे. आता हि दोन्ही शहरे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मागे असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय उपाययोजना करतात? हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.