Chikhali : रिक्षाचालकांना तातडीने पाच हजारांची मदत करा- दिनेश यादव

Give Rs 5,000 grant to rickshaw pullers immediately - Dinesh Yadav : कोरोनामुळे रिक्षाव्यवसाय संकटात

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणुमुळे सर्वच उद्योगांसह रिक्षाव्यवसाय देखील संकटात सापडला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असून त्यांना महापालिकेच्यावतीने विनाअट तातडीने पाच हजारांची मदत करावी,  अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. शहरातील रिक्षाचालकांनी नविन रिक्षा घेताना व दर वर्षाला पासिंगसाठी शासनाच्या तिजोरित हजारो, लाखो रुपयाची भर टाकली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना संकटामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून गेला आहे.

त्यातच रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरणेही या रिक्षाचालकांना कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षा चालक व त्यांचे कुटुंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

सार्वजनिक प्रवाशी सेवा पुरविणाऱ्या रिक्षा चालकांना सावरण्यासाठी महापालिकेने त्यांना पाच हजारांची मदत करावी, अशी मागणी यादव यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.