Chikhali : आमदार महेश लांडगे यांची चिखली गावात जंगी पदयात्रा

एमपीसी न्यूज – महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी टाळगाव चिखली भागात पदयात्रा काढली. टाळगाव चिखलीच्या प्रवेशद्वारावर महेश लांडगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिवादन करून गावक-यांसोबत बैलगाडीतून त्यांनी प्रचारदौरा केला. माजी नगरसेविका साधना जाधव आणि काही कार्यकर्त्यांनी महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. चिखलीकरांनी महेश लांडगे यांना भरगोस प्रतिसाद दिला.

भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी टाळगाव चिखली भागात प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्याची सुरुवात चिखली मधील मुख्य प्रवेशद्वार येथून झाली. प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून चिखलीकर ग्रामस्थांच्या भव्य उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली.

महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका साधना जाधव, रामदास जाधव, निलेश नेवाळे आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महेश लांडगे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच पिंपरी चिंचवड चर्मकार महासंघाच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला.

चिखली परिसरातून शंभर टक्के मतदान आमदार महेश लांडगे यांना होईल, असा विश्वास महापौर राहुल जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. “आपापसातले सर्व मतभेद विसरून परिसराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. समाजकारणाचा वसा पुढे कायम सुरू ठेवावा”, असा सल्ला महेश लांडगे यांनी यावेळी बोलताना दिला. भव्य पुष्पहार घालून महेश लांडगे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बैलगाडीतून प्रचारयात्रा काढण्यात आली.

चिखली प्रवेशद्वार, जैन मंदिर, गांधी चौक, जाकमाता मंदिर, टाळ मंदिर, चिंतामण नगर, महादेव नगर, लक्ष्मी रोड, बापूजी बुवा मंदिर, रामदास नगर, सुवर्णयुग चौक, सप्तशृंगी कॉलनी, श्री संतकृपा नगर, गीताई कॉलनी, गणेश नगर, चंद्रभागा गो शाळा गो संवर्धन संस्था, पाटील नगर, केसर व्हॅली सोसायटी, संस्कृती सोसायटी, गोकुलम सोसायटी, राम मंदिर, नेवाळे कॉलनी, भांगरे कॉलनी, हरिओम कॉलनी, गणेश कॉलनी या भागातून पत्रयात्रा काढली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.