Chikhali: दोन अल्पवयीन गुन्हेगारांकडून 25 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चिखली पोलिसांच्या पथकाने सव्वा लाखांचे 25 मोबाईल जप्त केले.

चिखली पोलीस ठाण्याचे एक पथक कुदळवाडी भागात गस्त घालत होते. यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर मोटारीवरून जाणा-या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना बघताच आरोपी न थांबता पुढे गेले. पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 1 लाख 14 हजार रूपयांचे 25 मोबाईल जप्त केले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदिप बागुल, पोलीस हवालदार मंगेश गायकवाड, राम साबळे, सुरेश जाधव, सुनिल शिंदे, नरहरी नाणेकर, अमोल साकोरे, सचिन गायकवाड, कबिर पिंजारी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.