Pune – आंबेगाव-बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून 24 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – मंदिरातील दानपेटी फोडून 24 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना आंबेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिरात काल शुक्रवारी (दि.23) पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी हनुमंत बेलदरे(वय 48, रा.आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव-बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराच्या बाजुला असलेल्या लोखंडी ग्रीलचे स्क्रु काढून दोन अज्ञात चोरट्यांनी संरक्षण जाळी उघडली. त्यावाटे त्या चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून भैरवनाथ मंदिराच्या मूर्तीसमोर ठेवलेली दानपेटी फोडली आणि दानपेटी मधील 5 हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 24 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.