Pimpri : पाच सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज – गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांवर पिंपरी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

शक्ती रामरतन बहोत (वय-30, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी), विशाल बबन गायकवाड (वय-22, रा. गिरजुबाबा मंदिरामागे, बौध्दनगर, पिंपरी), मनोहर मारूती सुर्वे (वय-40, रा. पत्राशेड, लिंकरोड, पिंपरी), जितेंद्र सावळाराम शिंदे (वय-30, रा. भिमनगर, पत्राशेड पिंपरी), लक्ष्मण बाळू शिंदे (वय-33, रा. वसंतदादा पाटील शाळेसमोर नेहरूनगर, पिंपरी) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाचही आरोपींना तडीपार केले आहे. आणखी काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.