Pune Crime News :दरोड्यातील आरोपीला पुणे पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज –  दरोड्यातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी गुन्हे शाखा युनीट दोन पथकाने अटक (Pune Crime News) केली आहे.  सुरेश उर्फ सुरज हरिद्वार गुप्ता (वय 31 रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आज (शनिवारी) करण्यात आली.

Pune News :पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा सराईत आहे. पुणे पोलीस हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा भोसरी येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला भोसरी येथून अटक केली आहे.त्याच्यावर फसवणूक, बेकायदा शस्त्र बाळगणे दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला(Pune Crime News) असून पुढील तपास पुणे पोलिसांचे गुन्हे शाखा दोन हे पथक करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.