chikhali News : शिवतेजनगर येथे दीडशे नागरिकांना मोफत धान्य वाटप

एमपीसीन्यूज : पूर्णानगर कृती समिती आणि लायन्स क्लब ऑफ अग्र सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनाज दान’ उपक्रमांतर्गत सफाई कामगार, परिचारिका या कोरोना योद्धयांसह ग्रोगरिबा नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात आला. या उपक्रमाचा सुमारे दीडशे नागरिकांनी लाभ घेतला.

शिवतेजनगर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. पूर्णानगर कृती समितीचे अध्यक्ष विकास गर्ग, लायन्स क्लब ऑफ अग्र सफायरचे अध्यक्ष भीमसेन अगरवाल, संचालक अशोक बन्सल, अशोक अगरवाल, रवींद्र सातपुते, समितीचे उपाध्यक्ष संभाजी बालघरे, स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिवसेनेचे शैलेश मोरे, ज्ञानेश्वर नागरगोजे आदींच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीकृष्ण काशीद, विनोद रोकडे, दीपक चलाखे, श्रीकांत करोळी आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन कालावधीत अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. अशा गोरगरीब नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने पूर्णानगर कृती समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांनी मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ अग्र सफायरचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.