Chakan : चाकण शहरात कडकडीत बंद ; शहरातून मूकमोर्चा  

एमपीसी न्यूज- कडूस (ता. खेड) येथे आषाढी एकादशीला झालेल्या गोवंश हत्येमुळे (Chakan) संपूर्ण खेड तालुक्यात मागील काही दिवसांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध‎ नोंदवण्यासाठी खेड तालुक्याच्या विविध गावातून बंदची‎ हाक देण्यात येत आहे.

सोमवारी‎ (दि.3 ) चाकण शहर आणि लगतच्या मेदनकरवाडी सह विविध गावांत, सर्व व्यवहार दुकाने‎ बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. चाकण शहरात आणि परिसरात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

चाकण मधील हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी बंदची हाक दिली होती. या बंदला चाकण मधील सर्व व्यापारी व दुकानदार मंडळींनी सर्व व्यवहार बंद ठेवून  पाठिंबा दिला. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा सुरू होत्या.

चाकण आणि लगतच्या गावातून बंद पुकारण्यात आल्याने चाकण पोलिसांनी शहरात व परिसरातील गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Today’s Horoscope 04 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

कडूस येथील  या घटनेचा निषेध नोंदण्यासाठी‎ सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास चाकण मधील माणिक चौक भागात नागरिक‎ एकत्र जमण्यास सुरुवात झाली. माणिक चौक येथून गोमातेचे पूजन करून मूकमोर्चा काढण्यात आला होता.

 

चाकण मार्केट यार्ड येथे या मूकमोर्चाची सांगता झाली. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी हे‎ परिस्थीतीवर लक्ष ठेवून शहरात तळ‎ ठोकून (Chakan) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.