Today’s Horoscope 04 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 04 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

04.07.2023.

शुभाशुभ विचार- 12 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30. 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वाशाढा ८.२५ पर्यंत नंतर उत्तराशाढा. 

चंद्र राशी – धनु 13.44 पर्यंत नंतर मकर.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत, सावध असावे. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी)

महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज नीतीबाह्य वर्तन अंगाशी येऊ शकते. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या.

कर्क (शुभ रंग- आकाशी)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींच्या सहवासात आज संध्याकाळी मजेत जाईल.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

आज कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करायचा तुमचा मूड असेल काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

तूळ ( शुभ रंग- मोतीया)

शेजार्यांशी किरकोळ कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रोधावर लगाम ठेवावा लागेल.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. मनी योजाल ते तडीस न्याल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकतो. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलातील.

धनु- (शुभ रंग- पिस्ता)

आज वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही करू नका. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज गरजेपुरते आध्यात्मिक व्हाल.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

मीन -(शुभ रंग – पांढरा )

नोकरदारांना ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असेल कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. अति व्यस्त दिवस.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.