Chikhali : कै नारायण केरबा मुंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन

एमपीसी न्यूज – कै नारायण केरबा मुंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे ( Chikhali) आयोजन करण्यात आले असून  प्रसिद्ध भागवतकार ह भ प भागवताचार्य केशव महाराज शास्त्री केज यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथ दिंडीने काल कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महात्मा फुलेनगर चिखली रोड येथील श्री गणेश मंदिर   येथे 25  मार्च ते  1 एप्रिलदरम्यान दररोज सायंकाळी 6.30  ते 9.30 यावेळेत कार्यक्रम होईल . 1 एप्रिल रोजी ह भ प तुषार महाराज दळवी यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Maharashtra : महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित; मावळमध्ये महायुतीतर्फे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

या कार्यक्रमातून युवकांना चांगला संदेश मिळेल व त्यांच्या जीवनात कोणत्या प्रकारचा बदल करायाला हवा हा अनमोल संदेश मिळेल. त्यामुळे जास्ती जास्त युवकांनी या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे. तसेच श्रीरामचरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोकुळलीला, गोवर्धनलीला, रामलीला, कंसवध, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह, होमहवन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन कै नारायण केरबा मुंडे प्रतिष्ठान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात ( Chikhali) आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.