Maharashtra : महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित; मावळमध्ये महायुतीतर्फे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

आज अधिकृतपणे घोषणा करण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – महायुतीच्या जागावाटपात शिंदें गटाच्या शिवसेनेच्या ( Maharashtra) उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या जागांची अधिकृतपणे घोषणा करतील,अशी माहिती संजय मंडलिक यांनी दिली आहे.

महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपला 30 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत.

Pune : बिबवेवाडी परिसरात तरुणाचा खून

मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी निश्चित

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यास भारतीय जनता पक्षाकडून विरोध तीव्र होऊ लागल्याने बारणे यांचे टेन्शन वाढले होते. त्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे धाव घेतली होती. या अंतर्गत वादावर तोडग्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर बैठका चालू होत्या.अखेर  श्रीरंग बारणे यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे म्हटले  जात आहे.मतदारसंघात भाजपची सर्वाधिक ताकद असतानाही मागील तिन्ही निवडणुकीत हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे गेला. प्रत्येक वेळी भाजपने युती धर्माचे पालन करून शिवसेनेचा खासदार निवडून ( Maharashtra) दिला आहे.

 

या असतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या  जागा   

 

  • रामटेक : राजू पारवे
  • वाशिम यवतमाळ संजय राठोड
  • ठाणे : प्रताप सरनाईक
  • कल्याण – डोंबिवली : श्रीकांत शिंदे
  • दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे
  • मावळ : श्रीरंग बारणे
  • कोल्हापूर: संजय मंडलिक
  • हातकणंगले : धैर्यशील माने
  • बुलढाणा : प्रतापराव जाधव
  • शिर्डी : सदाशिव लोखंडे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.