Chikhali : बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे फटाके (Chikhali) बनवणाऱ्या कारखान्यावर चिखली पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाख रुपये किंमतीचे स्फोटक पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सोनवणे वस्ती चिखली येथे करण्यात आली.

विक्रांत राज देशमुख (वय 36, रा. कसबा पेठ, पुणे), संतोष टायप्‍पा शिवशरण (वय 44, रा. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रशेखर चोरगे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून लोकांच्या जीवनात धोका निर्माण होईल अशा परिस्थितीमध्ये फटाके बनविण्यासाठी लागणारी स्फोटके बाळगली. यासाठी आरोपींनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात शिक्षकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न

याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी (Chikhali) कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 500 रुपये किंमतीचे स्फोटके आणि केमिकल जप्त केले. या प्रकरणाचा चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.