Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात शिक्षकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात (Talegaon Dabhade) शिक्षकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. निवृत्त सनदी अधिकारी सुधीर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, नियामक मंडळाच्या सदस्या निरुपा कानिटकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य जी एस शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सुधीर राऊत यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून स्पर्धापरीक्षा आणि त्यांच्या तयारीबद्दल लागणाऱ्या सर्व गोष्टी उपस्थित प्राध्यापकांना समजावून सांगितल्या. स्वतः अधिकारी असल्याने प्रशासन सेवेतील सर्व सूक्ष्म गोष्टींची माहिती राऊत यांनी दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी (Talegaon Dabhade) केले. यावेळी बोलताना डॉ. मलघे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा सर्वांगीण आढावा घेतला.

तसेच महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे विद्यार्थ्यांना झालेला फायदा व महाविद्यालयाच्या भविष्यकालीन शैक्षणिक विकास कामांचा लेखाजोखा डाॅ मलघे यांनी मांडला.

यावेळी आपल्या मनोगतात निरुपा कानिटकर यांनी काळाच्या पुढे जात नवीन तंत्रज्ञानाचा वापर विवेकी पद्धतीने करावा. मेंदूला कायम चालना मिळाली पाहिजे असे सांगत त्यांनी आपल्या क्षमता वृद्धिंगत करण्याचा सल्ला उपस्थित शिक्षकांना दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत शेटे म्हणाले की, नव्या बदलांना आपल्याला सामोरे जायचे आहे. संस्था आता वेगळया स्वरूपात पुढे जात आहे. अनेक कौशल्याधारित आणि व्यावसायिक अभ्यासक्रम नजिकच्या भविष्यकाळात आपल्याकडे सुरू होत आहेत.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अनेक मार्गाने संस्था बांधील असल्याचे मत संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.

Khed : राक्षेवाडीत लपून बसलेल्या तडीपार दोन गुंडांना अटक

पाहुण्यांचा परिचय प्रा.प्रमोद बोराडे यांनी करवून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सत्यजित खांडगे आणि प्रा. संदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. मिलिंद खांदवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.