Khed : राक्षेवाडीत लपून बसलेल्या तडीपार दोन गुंडांना अटक

एमपीसी न्यूज : पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस व पिंपरी (Khed) चिंचवड पोलीस आयुक्तालय या हद्दीतून तडीपार असलेल्या दोघांना खेड पोलिसांनी राजगुरुनगर ( ता. खेड , जि. पुणे ) जवळील राक्षेवाडी येथून शनिवारी (दि. 29 जुलै ) जेरबंद केले आहे.

राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथील गणेश मंदिराच्या समोर बालाजी पार्क ए विंग मधील फ्लॅट नंबर 15 मध्ये तडीपार गुंड सोहेल सलीम कनुल (वय 21 वर्ष रा.र विमान नगर पुणे) व ऋषिकेशउर्फ बबल्या गुलाबराव घुले (वय 23 रा. बोपखेल गावठाण पुणे) अशा दोघांना खेड पोलिसांनी तडीपार असताना हद्दीत आल्याबद्दल व तडीपारच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल अटक केली आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojna : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

याबाबत पोलिस हवालदार संतोष मोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed) फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.