Chikhali : ग्राहकांनी नवीन घरासाठी दिलेले 21 लाख रुपये घेऊन सेल्स पर्सन फरार

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर मुख्य सेल्स पर्सन म्हणून काम (Chikhali)करत असलेल्या एका व्यक्तीने ग्राहकांकडून घरांसाठी 21 लाख रुपये रोख रक्कम घेतली. हे पैसे घेऊन तो फरार झाला. याप्रकरणी त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नेवाळेवस्ती, चिखली येथे घडला.

सायमन रॉनी पीटर (वय 40, रा. वागाव मावळ) असे आरोपीचे नाव आहे. गणेश पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Nigdi : दुकान चालविण्यासाठी दुकानदाराकडे मागितली खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chikhali)पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे आरोपी सायमन हा मुख्य सेल्स पर्सन म्हणून काम करतो. त्याने पाटील यांच्या परस्पर तीन ग्राहकांकडून नवीन घरांसाठी 21 लाख रुपये रोख रक्कम घेतली.

पाटील यांनी सायमन याला ऑफिसच्या कामासाठी 20 हजारांचा लॅपटॉप दिला होता. सायमन हा 21 लाख रुपये रोख रक्कम आणि 20 हजारांचा लॅपटॉप घेऊन पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.