Chikhali : कुदळवाडी परिसरात पथदिवे चकाचक 

एमपीसी न्यूज –  कुदळवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विद्युत पोलवरील दिवे बंद व नादुरुस्त झाले होते. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पथदिवे दुरुस्तीबाबत पाठपुरावा चालू होता. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. 

 महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. भैरवनाथ मंदिर परिसर, भक्ती शक्ती नगर, यादवनगर येथील बंद पडलेले विद्युत पथदिवे दुरुस्ती व नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.