Chikhali : संतगुरू रोहिदास महाराज यांच्या समानतेच्या विचारांची मंदिरे उभारली जाताहेत – बबनराव घोलप

एमपीसी न्यूज- संत गुरू रोहिदास महाराज जयंती म्हणून साजरी न करता तो सर्वसामाजाचा आनंदाचा व उत्सवाचा सण म्हणून सर्वानी साजरा केला गेला पाहिजे. कारण संत गुरू रोहिदास महाराज यांनी त्यांच्याअंतर वाणीतून भारत देशामधील जागतिक स्तरातील राष्ट्रीय संत म्हणून त्यांनी त्यांच्या क्रांतीकारक, समतावादी व विज्ञानधिष्ठित विचार तसेच आपल्यामध्ये असलेलले पंचतत्वांचे महत्व सहाशे वर्षापूर्वी देशभर पोहचविला होते, असे प्रतिपादन माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले. चिखली येथील संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी (दि.7) घोलप बोलत होते. 

कार्यक्रमासाठी आमदार महेश लांडगे, अखिल भारतीय रविदासीया धर्मसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव महाराज वाघमारे, लिडकॉम चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सिनियर पीआय बालाजी सोनटक्के, नगरसेविका साधना मळेकर,कुंदन गायकवाड, संतोष मोरे, दिनेश यादव, सुनील लोखंडे, सुरेश तात्या म्हेत्रे , विकास साने, विनायक मोरे,अंकुश मळेकर, जितु यादव, प्रल्हाद कांबळे, दत्तात्रय शिंदे, अंकुश आंबेकर सचिन सोनवणे, सुनिल लांडे. भाऊसाहेब रोकडे ,गणेश महाराज भुजबळ , बळीराम वाघमारे, तुकाराम कांबळे, संदीप शेलार,अमोल वाघमारे, गोरक्ष मोरे ,सुरेखा सुर्वे, बाळासाहेब सातपुते,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी घोलप म्हणाले, समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा,जुनाट रूढी व पारंपारिक विचार याविरोधात क्रांतीकारक आवाज उठवून, विज्ञानवादी व सर्व समाजाला समानतेची वागणूक कशी देता येईल? यांसाठी महाराजांनी प्रयत्न केला होता. अशा संतगुरू रोहिदास महाराज यांचे विचार आज जगामधील देश घेत असून संपूर्ण भारत देशाबरोबरच जगामध्ये ही त्यांच्या समानतेच्या आदर्श विचारांची मंदिरे उभारली जात असल्याचे मत माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केले.

रोहिदास प्रतिष्ठाण, चिखली व राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त ग्रामस्थ चिखली यांच्यावतीने संत रोहिदास महाराज यांचा जयंती उत्सव चिखली येथील गुरु संत रोहिदास समाजमंदीरात साजरा करण्यात आला. संत रोहिदास महाराज यांच्या ६४३ व्या जयंती प्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले.

यावेळी सिनियर पीआय बालाजी सोनटक्के यांना “समाजभुषण पुरस्कार” देण्यात आला.तसेच आमदार महेश लांडगे यांना “कार्यक्षम आमदार”, व सुखदेवजी महाराज वाघमारे यांना “धर्म भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत गुंड यांनी केले. यावेळी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.