China : चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वसनाच्या नवीन आजाराची साथ ; डब्ल्यूएचओने बीजिंगला या नवीन आजाराबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले

एमपीसी न्यूज –  कोरोनानंतर चीनमध्ये नवीन आजार पसरत आहे.हा नवीन ( China ) आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येत आहे.  रिपोर्ट्सनुसार, अनेक आजारी लहान मुलं चिनी रुग्णालयांमध्ये दाखल झाली आहेत. सर्व लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने  सांगितले की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे.

Mulshi : धक्कादायक! गवतात आढळले जिवंत अर्भक; लिंगाच्या ठिकाणी गंभीर जखम

या नवीन आजाराचा संसर्ग झालेल्या लहान मुलांच्या कुटुंबीयांच्या वतीनं एका चिनी वृत्तवाहिनीनं ( China ) सांगितले  आहे की, या आजाराची कोणतीही नवी लक्षणं नाही, परंतु, मुलांना सतत ताप येतोय आणि त्यांच्या फुफ्फुसांत गाठी तयार होत आहेत. लहान मुलांच्या उपचारासाठी चीनच्या रुग्णालयांमध्ये लाबंच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. आजारांवर लक्ष ठेवून त्यांचं विश्लेषण करणारी वेबसाईट प्रोमेड मेल अलर्टमध्ये एका मेडिकल स्टाफच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, “रुग्णांना तब्बल 2 तासांपर्यंत रांगेत वाट पाहत राहावी लागत आहे. बेडही शिल्लक नाहीत.”

चायना डेलीमधील एका अहवालात म्हटले आहे की, “चीनमध्ये श्वसनासंबंधित आजारांनी डोकं वर काढले आहे. या रहस्यमयी आजाराचा संसर्ग लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, “काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे; या आजारामुळे चीनमधील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.”

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला या नवीन आजाराबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले आहे.आजारानं इतर देशांची  चिंता मात्र  वाढवली ( China ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.