Mulshi : धक्कादायक! गवतात आढळले जिवंत अर्भक; लिंगाच्या ठिकाणी गंभीर जखम

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील अकोले येथे दोन ते तीन दिवसांचे जिवंत (Mulshi) अर्भक निर्जन ठिकाणी गवतात सापडले. त्या अर्भकाच्या लिंगाच्या ठिकाणी गंभीर जखम झाली आहे.
गुरुवारी (दि. 23) सकाळी मुळशी तालुक्यातील अकोले येथे निर्जन ठिकाणी गवतात जिवंत अर्भक सापडले. त्याचे वय सुमारे दोन ते तीन दिवस आहे. अज्ञात पालकांनी त्या अर्भकाचा परित्याग केला आहे. यातील धक्कादायक बाब अशी की त्या अर्भकाच्या लिंगाच्या ठिकाणी गंभीर इजा झाली आहे.

अर्भकाच्या लिंगाची जागा कापली असावी अथवा प्राण्यांनी खाल्ली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गवतात एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. अर्भकाला पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बाळाची प्रकृती स्थिर आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या (Mulshi)  या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जातआहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.