Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानतर्फे 30 हजार मूर्ती तर 21 टन निर्माल्य जमा

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठानतर्फे थेरगाव पूल व वाल्हेकरवाडी विसर्जन घाटांवर सात, नऊ, दहा आणि बाराव्या दिवशी एकूण 30 हजार 365 मूर्ती तर 21 टन निर्माल्य जमा करण्यात आले.

गणपती विसर्जन करतेवेळी मूर्तीसोबत असलेले निर्माल्य नदीत टाकल्याने नदी प्रदूषण होऊ नये यासाठी विविध सामाजिक संस्थांतर्फे निर्माल्य दानाचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे मूर्ती नदीत सोडल्याने देखील नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, यासाठी मूर्तिदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. संस्कार प्रतिष्ठानतर्फे देखील मूर्तीदान व निर्माल्यदानाचा उपक्रम राबविण्यात आला.

टाटा व्हॉलेंटिअरींग टाटा मोटर्स, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेज पिंपरी, प्रतिभा कॉलेज चिंचवड, जनवादी महिला संघटना, जनआरोग्य अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संस्कार संस्कृती सद्भावना महिला बचत गट इत्यादी संघटना थेरगाव पूल व वाल्हेकरवाडी विसर्जन घाटावर राबविण्यात आलेल्या मूर्तीदान व निर्माल्यदान उपक्रमात सहभागी झाल्या. थेरगाव पूल घाटावर सात नऊ दहा व बाराच्या दिवशी एकूण २३ हजार ८८१ मूर्तीदान करण्यात आल्या  तर १५ टन निर्माल्य जमा करण्यात आले. वाल्हेकरवाडी विसर्जन घाटावर सात, नऊ, दहा व बाराव्या दिवशी सहा हजार ५३५ मूर्तीदान करण्यात आल्या तर सहा टन निर्माल्य जमा करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मूर्ती व निर्माल्यदानाची आकडेवारी -थेरगाव पूल घाट

 
​थेरगाव पूल घाट​

 अ.क्र.

विसर्जन दिवस

मूर्तीदान

निर्माल्यदान

सातवा

४५५०

३ टन 

नववा

१७५

२ टन

दहावा

५७५

२ टन

बारावा

 १८,५८१

 ८ टन

एकूण

२३,८८१

 १५ टन

वाल्हेकरवाडी विसर्जन घाट
 

अ.क्र.

विसर्जन दिवस

मूर्तीदान

निर्माल्यदान

सातवा

१९२५

२ टन

नववा

१६१०

१.५ टन

दहावा

९००

०.५ टन

बारावा

२१००

२ टन

एकूण

६,५३५

६ टन

"murtidan

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.