Chinchwad : डेरवण युथ फेस्टिव्हल स्पर्धेसाठी हेवन जिम्नास्टीक अकादमीचे 8 खेळाडू घेणार सहभाग

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती (Chinchwad) निमित्ताने SVJCT क्रिडा अकादमी (डेरवण-रत्नागिरी) दरवर्षी डेरवण युथ फेस्टिव्हलचे आयोजन करतात. या स्पर्धेत अनेक खेळांचे आयोजन केले जाते. यावर्ष 8 ते 9 मार्च रोजी ऐरोबिक जिम्नास्टीक या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधून हेवन जिम्नास्टीक अकादमीचे 8 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी 5 मार्च रोजी रहाटणी येथे अकादमीतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (API ) व 2022 मध्ये आर्यनमँन स्पर्धा पूर्ण केलेले खेळाडू राम गोमारे व अकादमीचे हितचिंतक अभिजात पाठक कार्यक्रमाला उपस्थित होते.

राम गोमारे यांनी मनोधैर्येचे महत्त्व अतिशय सुंदररित्या मांडले. आहार, वेळ, अभ्यास आणि इतर बाबींमध्ये समन्वय देखील मांडले. अभिजित पाठक यांनी मुलांचे कौतुक केले. पाहुण्यांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. तसेच, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांची स्पर्धा तांत्रिक प्रमुख म्हणून निवड झाली आहे.

या निमित्ताने त्यांचेही कौतुक करण्यात आले. स्पर्धेला पंच म्हणून प्रणित आढाव काम बघणार आहेत. पाहुण्यांचा सत्कार अतुल पाटील व रोहित कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अकादमीच्या प्रमुख प्रशिक्षक अलका तापकीर व चैतन्य कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या (Chinchwad) प्रमाणात उपस्थित होता. सहभागी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे –

11 वर्षावरील गट

1.सिद्धी मारणे (वैयक्तिक), 2. गितीका चौधरी (वैयक्तिक), 3.सानवी पाटील (वैयक्तिक व तिहेरी), 4.अंतरा कळमकर (वैयक्तिक), 5. धानी पटेल (वैयक्तिक व तिहेरी), 6. श्रृष्टी खोडके(तिहेरी)

14 वर्षावरील गट
अनवी पाटील (वैयक्तिक)

17 वर्षावरील गट
परीजा क्षीरसागर (वैयक्तिक)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.