Chinchwad : आनंद बक्षी यांच्या सदाबहार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- शब्दधन काव्यमंच आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध सिनेगीतकार आनंद बक्षी यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथे त्यांच्या गाजलेल्या गीतावर आधारित “आनेसे उसके आये बहार” या कार्यक्रमातून साहित्यिकांनी आदरांजली समर्पित केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्पमित्र आणि गायक दीपक शर्मा होते. संगीतकार अक्षय लोणकर, शोभा जोशी, सुहास घुमरे, नंदकुमार मुरडे, मुरलीधर दळवी, कैलास भैरट, निशिकांत गुमास्ते, गणपती पांचाळ आदी उपस्थित होते.  दीपक शर्मा म्हणाले, “आनंद बक्षी यांनी आपल्या सहज, साध्या,सोप्या भाषेत लोकसंगीतावर आधारित असंख्य गीते लिहिली. लोकांच्या मुखी आजही त्यांच्या रचना रुंजी घालीत आहेत”

  • शर्मा यांनी आपल्या मधुर आवाजात “आदमी मुसफिर है, आता है जाता है..”(अपनापन) आणि “नफरत की दुनिया को छोडके प्यारकी दुनियामे.”.(हाथी मेरे साथी) ही गीते सादर करून संगीतमय वातावरण निर्मिती केली. नंदकुमार कांबळे यांनी “दिये जलते है फुल खिलते है” हे गीत सादर केले. बाळासाहेब घस्ते यांनी “जिंदगीके सफरमे गुजर जाते है जो मकाम..”(आपकी कसम) प्यार दिवाना होता है..(कटी पतंग) गीते सादर करून धमाल केली. सविता इंगळे यांनी “बिंदीया चमकेगी, चुडी खनकेगी..”( दो रास्ते) रचना सादर केली.

देवेंद्र गावंडे यांनी “जितनी चाबी भरी रामने, उतना चले खिलौना..”गीत सादर केले. सुधाकर कुलकर्णी यांनी सादर केलेल्या आनंद बक्षी यांचे सुपरहिट “चिंगारी कोई भडके.” आणि अशोक देशमुख यांनी “मेरे सपनो की राणी कब आयेगी तू ” या गीतांनी रसिकांची वाह वाह मिळवली. रघुनाथ पाटील यांनी “एक रुत आये एक रुत जाये..”शरद शेजवळ यांचे “आनेसे उसके आये बहार..”रवी भोसले यांचे “मै जट यमला पगला दिवाना..”आणि शिर्डीवाले साईबाबा..तर संगीता झिंजूरके यांनी “तोहे सवरीया, नाही खबरीया..”शाम सरकाळे यांचे “जीनेकीं राह बताये ..”अशा सुंदर गीतरचना सादर झाल्या.

प्रास्ताविक तानाजी एकोंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरेल सांगता शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी “अच्छा तो हम चलते है” या गीताने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.