Chinchwad : अजित पवार यांचे गणेश मंडळ भेटीतून शक्तिप्रदर्शन

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. 24) पिंपरी चिंचवड (Chinchwad) शहरातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. या भेटीच्या कार्यक्रमाला मोरया गोसावी समाधी मंदिरातून सुरुवात झाली. गणेश मंडळांना भेटी, उद्घाटन, पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम राहिला.

MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग तीन)

गणेश मंडळ भेटीतून शक्तिप्रदर्शन
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवार यांचा एकहाती अंमल होता. पण सन 2017 च्या निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता आली आणि बालेकिल्ला ढासळला. आता पुन्हा शहरात सत्ता आणण्याचे टार्गेट ठेऊन राष्ट्रवादी पक्ष कामाला लागला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. शनिवारी रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर रविवारी अजित पवार यांनी शहराचा दौरा करून शक्तिप्रदर्शन केले. ठिकठिकाणी अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

एकीकडे रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचे दौरे वाढवले. नुकतीच रोहित पवार यांनी शहरात बाईक रॅली काढली. त्यानंतर गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. तर दुसरीकडे स्वतः अजित पवार यांनीही शहरात लक्ष घातले आहे. मी केवळ विकास कामांसाठी फिरत आहे, असे अजित पवार यांनी रविवारी (दि. 24) प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्याकडून देखील शहरातील जुन्या-नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या मंडळांना दिल्या भेटी
जय बजरंग मित्र मंडळ निगडी, सुवर्ण युग मित्र मंडळ, यमुनानगर, श्रीराम भक्त हनुमान मित्र मंडळ, ओटा स्किम, गणेश विसर्जन हौद, गणेश मित्र मंडळ तळवडे, ज्योतिबा तरूण मंडळ तळवडे, श्री छत्रपती शिवाजी मंडळ तळवडे, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल साने चौक, हनुमान मित्र मंडळ ताम्हाणे वस्ती, वुडस् व्हिला फेज 1 बो-हाडेवाडी, शिवतेज मित्र मंडळ, मोशी, तनिष्क ऑर्चिड फेज 2 चहोली, आदर्श मित्र मंडळ दिघी, खंडोबा माळ मित्र मंडळ भोसरी, गव्हाणे तालीम मित्र मंडळ भोसरी, नव महाराष्ट्र मित्र मंडळ लांडेवाडी, साम्राज्य प्रतिष्ठान इंद्रायणीनगर, गणेश मंदिर आदर्श मित्र मंडळ संत तुकारामनगर, विठ्ठल तरूण मंडळ दापोडी, नाना पेठ मित्र मंडळ पिंपरीगाव, अष्टविनायक मित्र मंडळ पिंपरीगाव, सुपर मित्र मंडळ पिंपरी कॅम्प, शिवबा प्रतिष्ठान, पिंपरी, हनुमान तरूण मंडळ चिंचवड स्टेशन चिंचवड, यशस्वी मित्र मंडळ चिंचवड स्टेशन चिंचवड, समता तरूण मंडळ मोहननगर,

त्रिमूर्ती मित्र मंडळ, रामनगर, श्रीराम मित्र मंडळ रामनगर, राष्ट्रतेज मित्र मंडळ काळभोरनगर, हनुमान मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, विवेक मित्र मंडळ प्राधिकरण, चिंतामणी मंदिर वाल्हेकरवाडी, सिध्दीविनायक मित्र मंडळ मामुर्डी, शिवप्रताप मित्र मंडळ रहाटणी, श्रीमंत छत्रपती शिवाजी तरूण मंडळ थेरगाव, स्पिज कौंटी सहकारी सोसायटी थेरगाव, श्रीकृष्ण मित्र मंडळ काळेवाडी, शिवशंभो मित्र मंडळ महादेव मंदिर पिंपळे सौदागर, छत्रपती युवा प्रतिष्ठान पिंपळे निलख, विद्यानगर मित्र मंडळ नवी सांगवी, बारामती मित्र मंडळ नवी सांगवी, सिझन ग्रुप सांगवीचा राजा सांगवी, शितोळेनगर क्रिडा मित्र मंडळ सांगवी, एकता विकास प्रतिष्ठान जवळकरनगर पिंपळेगुरव या मंडळांना भेटी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. चिखली येथे एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. तसेच एका हॉटेलचे देखील त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर अजित पवार यांनी वाकड येथील विसर्जन घाटावर भेट देऊन पाहणी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.