Alandi : आळंदीमध्ये देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) शहरात गणेशोत्सव निमित्त गणेश मंडळाने आकर्षक असे देखावे सादर केले आहेत.  देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

Chinchwad : अजित पवार यांचे गणेश मंडळ भेटीतून शक्तिप्रदर्शन

यंदा जय गणेश मित्र मंडळाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,पंढरपूर प्रतिकृती ,राजे ग्रुप मंडळाने मुलींवर भ्याड हल्ला, जय गणेश प्रतिष्ठाण यांनी काल्पनिक शिवकालीन गुहा, जय भवानी मित्र मंडळाने वटसावित्री,दत्त नगर प्रतिष्ठाण यांनी पुरातन मंदिर तर न्यू दत्त नगर ग्रुप, एकलव्य प्रतिष्ठाण, पद्मावती माता मित्र मंडळ, हनुमान तरुण मंडळ, ज्ञानराजा मित्र मंडळ,अमर दीप मित्र मंडळ, सद्भावना मित्र मंडळ यांनी आकर्षक आरास,विद्युत रोषणाई केली आहे.

शिवस्मृती प्रतिष्ठाण यांची भव्य लालबागची 12 फुटी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.शिवतेज मित्र मंडळ सामाजिक बांधिलकी जपत दररोज विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना आरतीचे मान देत आहेत.हजेरी मारुती मंदिरातील गणेश मंडळात दररोज वारकरी संप्रदायाचे भजन कीर्तन होत आहे.
आळंदी शहरात विविध ठिकाणी बाल, तरुण गणेश मंडळाचा ही मोठ्या उत्साहा गणेशोत्सव साजरा होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.