Chinchwad : बुलेटच्या एक्सलेटरचा आवाज करू नका सांगितले म्हणून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज- दुकानासमोर गाडी थांबवून एक्सलेटर चा मोठ्याने (Chinchwad) आवाज का करतो अशी विचारणा केली म्हणून दोघांनी दुकान मालकालाच बेदम मारहाण केली आहे. ही घटना चिंचवड येथील फुलेनगर परिसरात रविवारी (दि.17) रात्री घडली.

याप्रकरणी ओंकार कृष्णा मुंडे (वय 19 रा .चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून संकेत प्रदीप कडलग, आकाश प्रदीप कडलक (दोघेही रा चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : बुलेटच्या एक्सलेटरचा आवाज करू नका सांगितले म्हणून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मालक सुनील शिंगटे यांचे चिंचवड परिसरात वडापाव चे दुकान आहे. आरोपी हे (Chinchwad) दुकानासमोर गाडी थांबवून त्यांच्या बुलेट गाडीचा एक्सलेटरचा आवाज करत होते.

यावर गाडीचा आवाज करू नको असे सांगितले असता आरोपी व त्याचा भाऊ दोघांनी मिळून शिंगटे यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड मारून शिंगटे व फिर्यादी यांना जखमी केले आहे.

यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.