Chinchwad Bye Election :  भाजप निवडणुकीसाठी कोणत्याही थराला जाते – अजित पवार

एमपीसी न्यूज – भाजप निवडणुकीसाठी कोणत्याही (Chinchwad Bye Election) थराला जाते. आयसीयूमध्ये असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना कसब्यात प्रचाराला उतरवले. जनाची नाही तर म्हणाची लाज वाटली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.  पिंपरी महापालिकेत भ्रष्टाचार फोफावला आहे. जॅकवेलच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळेनिलख येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, पदवीधर, शिक्षकांच्या मनात काय आहे हे महाराष्ट्राने जाणून घेतले. भावनिक नव्हे तर विकासाची निवडणूक आहे. भाजपला कार्यकर्ते तयार करता आले नाहीत. आमचे कार्यकर्ते घेतले. त्यांना आमदार केले. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्यांना कार्यकर्ते तयार करता आले नाहीत, ही शोकांतिका आहे. महापालिका भ्रष्टाचाराने बरबटली. पाण्याचा प्रश्न गहन झाला आहे. पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणण्याची माझी प्रामाणिक भूमिका होती. पण, मला बदनाम करण्यात आले. अजूनही हा प्रकल्प रखडला आहे.

 

मागील पाच वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही पाणी का आणू शकले नाहीत. भाजपच्या अंगात धमकच नाही. जाणीवपूर्वक महापालिका निवडणुका लावल्या जात नाहीत. तोडफोडीचे (Chinchwad Bye Election) राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही. जनता चिडली आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लावली जात नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांना आमदार, मंत्री, मुख्यमंत्री केले. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसेनेची जबाबदारी सांभाळतील असे शिवतीर्थावर सांगितले. तरीही 50 खोके घेवून गद्दारी केली. स्वतःच्या स्वार्थाकरिता किती टोकाची भूमिका घेतली. ज्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे नाव, चिन्ह त्यांच्याकडून काढून घेतले. महाराष्ट्र तुम्हाला कदापि माफ करणार नाही. जनता जागा दाखवेल, असेही पवार म्हणाले.

Alandi News : पथदिवे बंद असल्याने भक्त पुंडलिक मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, विचारांची, पुरोगामी, शाहू-फुले-आंबेडकर, मानवतेची लढाई आहे. मनुवादी, जातीवादीविरोधाच्या विरोधातील लढाईला पाठबळ मिळाले पाहिजे. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही कोरोना काळात माणसे, माणुसकी वाचवली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. जगाच्या नकाशावर शहराचे नाव पोहोचले. भाजपच्या काळात महापालिकेत (Chinchwad Bye Election) भ्रष्टाचार बोकाळला आहे. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करू शकले नाह

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.