Alandi News : आळंदी मध्ये शिवजयंती निमित्त जय्यत तयारी

एमपीसी न्यूज-उद्या (19 फेब्रुवारी) रोजी आळंदी येथे शिवजयंती निमित्त एक गाव एक शिवजयंती चे आयोजन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी 6 वा. श्रीं चा अभिषेक होणार आहे.

त्यानंतर क्षेत्र तुळापूर ते आळंदी शिवज्योत नेण्यात येईल.नंतर  9 ते 5 पर्यंत रक्तदान शिबिराचे (नगरपालिका चौक ) आयोजन करण्यात आले आहे.

Alandi News : पथदिवे बंद असल्याने भक्त पुंडलिक मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य

 

सायंकाळी 5 वा. भव्य मिरवणुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये प्रमुख आकर्षण चित्ररथ,ढोलताशा पथक,बँड पथक,वारकरी दिंडी,रांगोळी, नगारखाना, मर्दानी प्रात्यक्षिके,आश्वारूढ मावळे,फटाक्यांची आतिषबाजी हे असणार आहेत.

चाकण चौक ते नगरपालिका चौक(प्रदक्षिणा मार्ग )मिरवणूकीचा मार्ग असणार आहे.शिवजयंती निमित्त आळंदीकर ग्रामस्थांची जय्यत तयारी सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.