Chinchwad Bye-Election : भूलथापांना चिंचवडची जनता बळी पडणार नाही – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज  – भाजप, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी शहरात येऊन भूलथापा मारतील. नेहमीप्रमाणे आश्वासनांचा पाऊस पाडतात. (Chinchwad Bye-Election) पण, दोनही पक्षांनी चिंचवडमधील प्रश्न तडीस नेले नाहीत. चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करु शकले नाहीत. जनतेमध्ये संताप आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजप, आघाडीच्या भूलथापांना चिंचवडची जनता बळी पडणार नाही असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीला अपक्ष शिट्टी चिन्हावर राहुल कलाटे सामोरे जात आहेत. चिंचवडमध्ये सर्वत्र शिट्टीचे वारे वाहत आहे. मोठ्या-मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांपासून उपनगरांमध्ये शिट्टीचा आवाज घूमत आहे. कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

Shiv Jayanti : लंडनमध्ये ही घुमला जय शिवरायचा जयघोष

रावेत, पुनावळे,रहाटणी, थेरगाव या परिसरात पदयात्रा बैठका व भेटीगाठी घेऊन मतदारांसोबत त्यांनी संवाद साधला.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित संपूर्ण चिंचवड मतदारसंघ कलाटे पिंजून काढत आहेत. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रांगोळी काढून, फुलांची उधळण, औक्षण करत कलाटे यांच्या नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. राहुलदादा यावेळी आम्ही तुम्हालाच मत देणार असा विश्वास मतदारांकडून दिला जातो. जनतेचा मिळणार प्रतिसाद, प्रेम पाहता माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

चिंचवड मतदारसंघामधील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून या प्रश्नांचे भिजत घोंगडे कायम आहे. शास्तीकराचा जाच सहन करावा लागत आहे. घरांवरील टांगती तलवार कायम आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने या प्रश्नांवर केवळ राजकारण केले. प्रश्न मात्र तडीला लावला नाही.(Chinchwad Bye-Election) दररोज पाणीपुरवठाही देवू शकत नाही. यामुळे चिंचवडकरांमध्ये दोनही पक्षांच्या विरोधात रोष आहे. त्यामुळे भाजप, आघाडीच्या भूलथापांना बळी न पडता यावेळी चिंचवड मध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार चिंचवडच्या जनतेना केला असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.