Chinchwad Bye-Election : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह इतर संघटनांचा जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह (Chinchwad Bye-Election) शहरातील विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी या चिन्हावर लढत असलेले राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सभा घेतली. वंचित बहुजन विकास आघाडी, ठाकरे गटाचे शिवसैनिक कलाटे यांच्यासोबत असल्याचे दिसतात.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, भाजपचा ब्राह्मण समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय. या पक्षाचे निर्णय जे देशहित आणि समाजहित या दृष्टीने होत होते ते यापुढेही होतीलच असे नाही. 21 आमदार असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी असावा अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.

मागील वेळी कोथरूड व आता कसबा मतदार संघात समाजातील प्रतिनिधींना संधी नाकारण्यात आली. त्यामुळेच नाराजी तयार झाली. या सगळ्या करिता भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे. तसेच पक्ष स्थापनेपासूनब्राह्मण समाजाचा द्वेष करणाऱ्या स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला मत देण्यापेक्षा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Chinchwad Bye-Election) यांना आपण मतदान करावे. त्यांची निशाणी शिट्टी आहे.

Alandi : संत निरंकारी मिशनमार्फत आळंदीतील इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता

या संस्थांनी दिला राहुल कलाटे यांना पाठिंबा –

ब्राह्मण महासंघ, भारतीय पार्टी (लोकतांत्रिक), ख्रिस्ती नवनिर्माण सेना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, दलित पॅन्थर सेना, गोंधळी समाज विकास सेवा संघ, सम्राट अशोक सेना, स्वराज्यवादी बहुजन महासंघ, फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान, रिपब्लिकन जनशक्ती, स्वराज्य वाहन चालक संघटना, ईशाअते दिन / मदरसा अरबिया, हेल्प ऑफ पीपल चॅरिटेबल ट्रस्ट, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, दलित युवक आंदोलन महाराष्ट्र राज्य, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी, समता अधिकार आंदोलन, प्रबुद्ध संघ, अपना वतन, भीम आर्मी, पुणे जिल्हा, बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र पुणे अशा 33 संघटनांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.