Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे 35 कोटी, अश्विनी जगतापांकडे 32 तर नाना काटे 19 कोटींचे धनी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye-Election) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 35 कोटी 62 लाख 40 हजार 594 रुपयांची मालमत्ता आहे. तर, भाजपच्या अश्विनी जगताप यांची 32 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर, राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांची 19 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीनही उमेदवारांनी ही माहिती दिली आहे.

राहुल कलाटे यांचे बी कॉमचे शिक्षण झाले आहे. स्वत:चा शेती उत्पन्न आणि व्यापार हा उत्पन्नाचा स्त्रोत दाखविला. त्यांची खेड, नेरे मुळशीत शेत जमीन आहे. वाकड, रहाटणीत निवासी सदनिका आहेत.

त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता 34 कोटी 22 लाख 49 हजार 991 रुपये तर 1 कोटी 7 लाख 3 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर 1 कोटी 10 लाख 7 हजार 248 रुपयांचे कर्ज आहे.

त्यांच्याकडे 15 तोळे सोने आहे. वार्षिक उत्पन्न 62 लाख 40 हजार 270 रुपये आहे. कलाटे यांच्याकडे 92 हजार 640 रुपयांची रोकड आहे. त्यांच्याकडे एक रिव्हॉलर असून पिंपरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर एक गुन्हा दाखल (Chinchwad Bye-Election) आहे.

तर, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांची आणि कुटुबियांची 32 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अश्विनी जगताप या दहावी उत्तीर्ण आहेत.

जगताप यांनी शेती, व्यवसाय दाखविला आहे. चंद्ररंग डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स प्रा. लि. च्या संचालक, चंद्ररंग फार्म अॅण्ड नर्सरीच्या भागीदार तर चंद्ररंग डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स आणि चंद्ररंग अॅग्रो प्रा. लि.च्या भागधारक आहेत. व्यवसाय, गुंतवणुकीवरील व्याज व लाभांश हा उत्पन्नाचा स्त्रोत दाखविला आहे.

अश्विनी जगताप यांची जंगम मालमत्ता 16 कोटी 82 लाख 25 हजार 550 रुपये, स्थावर मालमत्ता 15 कोटी 34 लाख 93 हजार 751 रुपये आहे. एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 32 कोटी 17 लाख 19 हजार 301 रुपये आहे. तर, 6 कोटी 61 लाख रुपयांचे कर्ज आहे. 94 हजार 807 रुपयांची रोख रक्कम आहे. जगताप कुटुंबियांच्या पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली येथे शेती, बिगरशेती, निवासी व वाणिज्यिक इमारती आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथेही शेत जमीन आहे.

Chinchwad : चारचाकी दिली नाही म्हणून तोंडी तलाक बोलून केले दुसरे लग्न; गुन्हा दाखल

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्याकडे 3 कोटी 67 लाख 87 हजार 611 जंगम तर 15 कोटी 29 लाख 60 हजार स्थावर मालमत्ता आहे. नाना काटे यांनी शेती, हॉटेल व बांधकाम व्यावसाय उत्पन्नाचे स्त्रोत दाखविला आहे. त्यांचे शिक्षण 11 वी पर्यंत (Chinchwad Bye-Election) झाले आहे. काटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडे एक पिस्तूल आहे.

काटे यांच्या नावे पिंपळे सौदागर, रहाटणी येथे घर व कान्हूरमसाई, मुखई, रहाटणी येथे शेतजमीन आहे. पिंपळेसौदागरसह ताथवड्यात वाणिज्यिक इमारती आहेत. त्यांच्याकडे 3 कोटी 67 लाख 87 हजार 611 जंगम तर 15 कोटी 29 लाख 60 हजार स्थावर मालमत्ता आहे. 1 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज आहे. 35 तोळे सोने आहे. तर, वार्षिक उत्पन्न 14 लाख 97 हजार 780 रुपये आहे. त्यांच्याकडे 1 लाख रुपयांची रोख रक्कम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.