Pimpri : हातात कोयते घेऊन टोळक्याची चायनीज सेंटर येथे दहशत

एमपीसी न्यूज – हातात कोयते घेऊन (Pimpri) एक चार जणांचे टोळके पिंपरीतील एका चायनीज हॉटेलमध्ये घुसले व त्यांनी दहशत पसरवत गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झाले. ही घटना रविवारी (दि.5) रात्री घडली.

याप्रकरणी बालकृष्ण जीतमान श्रेष्ट (वय 33 रा.पिंपरी) यांनी मंगळवारी (दि.7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे 35 कोटी, अश्विनी जगतापांकडे 32 तर नाना काटे 19 कोटींचे धनी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मासुळकर कॉलनी येथील हिटलर क्रॉस चायनीज या हॉटेलमध्ये साफसफाई करत होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांच्या हातात कोयते होते.

त्यांनी शिवीगाळ करत धमकी देत त्यांनी दहशत निर्माण केली. तसेच हॉटेलच्या (Pimpri) ड्रॉव्हरमधून दिड हजार रुपये काढून घेतले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.