Chinchwad Crime : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 273 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 273 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 22) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पुन्हा वाढत आहे. मागील सहा दिवसात शहरात दररोज दीडशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहान प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसत आहे.

प्रशासनाकडून कोरोना साथीचा प्रादुभाव कमी करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. रविवारी एका दिवसात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 273 जणांवर कारवाई केली आहे.

एमआयडीसी भोसरी (32), भोसरी (31), पिंपरी (37), चिंचवड (1), निगडी (59), आळंदी (2), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (29), वाकड (40), हिंजवडी (15), देहूरोड (27), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.