Chinchwad crime : ठार मारण्याच्या उद्देशाने एकाला डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : तीन जणांनी 32 वर्षीय इसमाला जिवे मारण्याच्या उद्देशान डोळ्यात चटणी टाकून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे.(Chinchwad crime) ही घटना मंगळवारी (दि. 13) सायंकाळी प्रेमलोक पार्क चिंचवड येथे घडली.

विशाल अरुण कसबे (वय 32, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल यांचा भाऊ छतु अरुण कसबे (वय 40) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम गायकवाड, अबीर गायकवाड, एक महिला (सर्व रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lumpy vaccination : ब्राम्हणवाडी येथे जनावरांचे लंपी लसीकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कसबे यांचे एका मुलीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. त्या रागातून आरोपींनी विशाल यांना प्रेमलोक पार्क येथे बोलावून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले.(Chinchwad crime) याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.