Ravet ganja seized : रावेत मधून चार किलो गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : अंमली पदार्थ विरोधी पथकाने चार किलो गांजा सह एका तरुणाला एटक केले आहे. (Ravet ganja seized) ही कारवाई मंगळवारी (दि. 13) दुपारी रमाबाईनगर, शिंदेवस्ती येथे करण्यात आली.

मोहम्मद राजू नसरुद्दीन अली (वय 27, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यासह ओटास्कीम, निगडी येथे राहणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad crime : ठार मारण्याच्या उद्देशाने एकाला डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपी मोहम्मद याने गांजा बाळगला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद याच्या घरी मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली.(Ravet ganja seized) त्यात पोलिसांना एक लाख 950 रुपये किमतीचा चार किलो 38 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. आरोपी मोहम्मद याने हा गांजा ओटास्किम येथे राहणाऱ्या एका महिलेकडून आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.