Talegaon-Dabhade : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना तळेगाव मध्ये थांबा देण्याची मागणी

एमपीसी न्युज : सिंहगड, जयपूर – पुणे, पुणे – वेरावळ, दौंड – इंदौर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना तळेगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी जागरूक वाचक कट्टा हेल्प फाउंडेशनचे दिलीप डोळस व अमीत प्रभावळकर यांनी निवेदन देऊन केली आहे.(Talegaon-Dabhade) तळेगाव दाभाडे परिसरातील शिक्षण संस्था, संरक्षण दलाची कार्यालये, पर्यटन, उद्योग आदींचा विचार करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तळेगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा असे मागणीत म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या पुणे लोणावळा या दोन रेल्वे स्थानकाच्या मध्यावर आहे. औद्योगिक वसाहती,आंतरराष्ट्रीय कंपन्या,नामांकित शिक्षण संस्था, केंद्र सरकारची सी आर पी एफ बटालियन, आपत्कालीन रेस्क्यू फोर्स (NDRF), संरक्षण दलाचे डेपो, अत्याधुनिक नामांकीत हॉस्पिटल व आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थळे यामुळे देशातील अनेक नागरिक,विद्यार्थी आणि कर्मचारी प्रवासी तळेगांव रेल्वे स्टेशनवर येत असतात.(Talegaon-Dabhade) परंतु सिंहगड एक्सप्रेस11010/11009, जयपूर पुणे एक्सप्रेस 12939/12940, पुणे वेरावळ एक्स्प्रेस 11018/11017), दौंड इंदोर एक्सप्रेस 22943/22944…या लांब पल्ल्याच्या रेल्वेचा थांबा तळेगावला नसल्याने लोणावळा किंवा पुणे येथे जावे लागते किंवा तिथे उतरून या ठिकाणी यावे लागते.

Ravet ganja seized : रावेत मधून चार किलो गांजासह तरुणाला अटक

ही गैरसोय दूर व्हावी. यावर रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वे मंत्री महोदयांनी या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रेल्वे थांबवण्यासाठी सहकार्य करावे. तळेगांव येथे या सर्व एक्सप्रेसना थांबा मिळावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.