Wakad theft : वाकड येथील गाडीच्या शोरूममधून दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज : वाकड येथील गाडीच्या शोरूम मधून दोन लाख रुपयांची चोरी झाली आहे.(Wakad theft) ही घटना शनिवारी (दि.10) रात्री ते मंगळवारी (दि. 13) सकाळी बी यु भंडारी ऑटो प्रा ली या शोरूम मध्ये घडली.

राहुल दत्तात्रय खांदवे (वय 47, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon-Dabhade : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना तळेगाव मध्ये थांबा देण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील बी यु भंडारी ऑटो प्रा ली या शोरूम मध्ये शनिवारी (दि. 10) रात्री साडेसात ते मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत (Wakad theft)अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कॅश विभागातून दोन लाख 15 हजार पाच रुपये रोख रक्कम आणि हिशोबाचे व्हाउचर चोरून  पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.