Chinchwad crime : मुलांना चापट मारली म्हणून पत्नीचे डोके फोडले

एमपीसी न्यूज – पत्नीने मुलांना चापट मारली म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण (Chinchwad crime) करत तिचे डोके फोडले. ही घटना बुधवारी (दि.5 ) रात्री बिजलीनगर, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

संदीप पाटील (वय 31), सासू, सासरे शांताराम पाटील (सर्व रा. बिजलीनगर वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjawadi Crime : जागेचा जबरदस्ती ताबा घेत विकासकाला धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस त्यांची दोन्ही मुले त्रास देत होती, म्हणून त्यांनी मुलांना दोन चापटा मारल्या. यावरून त्यांच्या सासू सासऱ्यांनी फिर्यादीस, तू इथे राहायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली. पती संदीप याला बोलावून घेत सासू सासऱ्यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सांगितले.(Chinchwad crime) पतीने फिर्यादीस मारहाण केली. यात फिर्यादींच्या डोक्याला चार टाके पडले. पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत, तुला काय करायचे ते कर असे म्हणून पतीने फिर्यादीस धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.