Chinchwad Crime News : 25 लाखांची फळझाडे परस्पर तोडून विकली, चोरीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मालकाच्या परवानगी शिवाय 25 लाख रुपयांची फळझाडे परस्पर तोडून त्यांची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. मार्च 2021 दरम्यान रानमळा हॉटेल जवळ, वाल्हेकरवाडी याठिकाणी हा प्रकार घडला.

याबाबत नितीन दत्तात्रय चिंचवडे (वय 58, रा. आयडीएल कॉलनी, कोथरुड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय विठ्ठल चिंचवडे व शरद विठ्ठल चिंचवडे (रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी मालकाच्या परवानगी शिवाय मिळकतीत घुसले. त्यांनी आंबा, फणस, चिक्कू, बाभूळ व इतर छोटी मोठी झाडे तोडून त्यांची विक्री केली. यामध्ये 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.