Chinchwad crime News : वाहनचोर जोमात; पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी आठ दुचाकी चोरीच्या तक्रारी

एमपीसी न्यूज – सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनचोर चांगलेच जोमात आहेत. शहराच्या विविध भागातून आठ दुचाकी वाहने चोरीला गेल्याबाबत एकाच दिवशी (बुधवारी, दि. 7) तब्बल आठ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. योगेश उत्तम तुपे (वय 24, रा. मोशी) यांची 60 हजारांची मोपेड दुचाकी टाटा मोटर्स मेन गेट समोरील पार्किंगमधून चोरीला गेली आहे.

रविराज रोहिदास बोराटे (वय 29, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांची 90 हजारांची बुलेट चोरट्यांनी चिंचवड परिसरातून भर दिवसा चोरून नेली आहे. तर माया राजू गायकवाड (वय 40, रा. साईनगर, मामुर्डी) यांची 40 हजारांची मोपेड दुचाकी पिंपरी बौद्धनगर येथून पळवली आहे.

संजय खंडू मळेकर (वय 49, रा. देहू) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या कालावधीत मळेकर यांची 15 हजारांची दुचाकी चोरट्यांनी एमआयडीसी भोसरी येथील सेंच्युरी एन्का कंपनीसमोरून चोरून नेली आहे.

राहूल रमेश जोगदंड (वय 27, रा. पिंपळे गुरव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 35 हजारांची पल्सर दुचाकी गणेशनगर, बोपखेल येथून चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रमेश बाळशिराम पिंगळे (वय 39, रा. वराळे फाटा, तळेगाव दाभाडे) यांची 20 हजारांची दुचाकी सोमवारी (दि. 5) दुपारी पावणे दोन ते मंगळवारी (दि. 6) रात्री साडेबारा या कालावधीत यशवंतनगर येथील देवयानी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पूजा निलांबरी व्यंकटेश वेल्हाळ (वय 44, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची मोपेड दुचाकी बावधन येथील किराणा मालाच्या दुकानासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

तर तापकीर मळा चौक, काळेवाडी येथील चर्च समोरून धीरज राममिलन सिंग (वय 27, रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोकणेनगर, काळेवाडी) यांची 25 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत सिंग यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण परिसरात अज्ञात चोरट्यांनी आठ लाखांची जेसीबी देखील चोरून नेल्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी 11 लाख 5 हजारांची वाहने चोरून नेली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.