Chinchwad Crime News : बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्या बाबत सहा गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी चाकण, निगडी, आळंदी, पिंपरी आणि दिघी पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका गुन्ह्यात पोलिसांनी पिस्टल तर अन्य पाच गुन्ह्यात कोयते जप्त करण्यात आले आहेत.

योगेश प्रकाश वटंबे (वय 21, रा. आंबेठाण चौक, चाकण) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. विक्रांत रमेश फलके (वय 19, रा. फलके वस्ती, महाळुंगे, ता. खेड) याला कोयता बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

सुनील अंकुश धापटे (वय 27, रा. अजंठानगर, चिंचवड) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुनील शर्टाच्या मागे कोयता ठेऊन फिरताना आढळून आला आहे.

आळंदी पोलिसांनी एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी अमर सुरेश ओंबासे (वय 20, रा. पिंपरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून देखील कोयता जप्त करण्यात आला आहे.

दिघी पोलिसांनी देखील कोयता बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. सुरज उर्फ सोन्या नंदू घोटकुले (वय 21, रा. तापकीर नगर, देहूफाटा, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.