Chinchwad Crime News : दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या दोन घटना चिंचवड परिसरात घडल्या आहेत. श्रीधरनगर व गांधीपेठेत घडलेल्या या दोन घटनांमध्ये चोरटयांनी एक लाखांचे मंगळसूत्र  हिसकावून नेले आहे.

श्रीधरनगर, चिंचवड येथील पहिल्या घटनेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. 27 ऑक्टोंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी 12 ग्रॅम वजनाचे 55 हजार रूपयांचे मंगळसूत्र चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मंगळसुत्र चोरीची दुसरी घटना 20 ऑक्टोबर रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास गांधीपेठ, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या सासूला कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी 12 ग्रॅम वजानाचे 55 हजार रूपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे.

दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.