Pimple Gurav Crime News : पिंपळे गुरवमध्ये सहा लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा सहा लाखांचा ऐवज चोरून नेला. मोरया पार्क, पिंपळे गुरव येथे सोमवारी (दि.21) रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी रॅनसन जोजेफ डिसुजा (वय 28, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलुप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील रोख रक्कम व 129 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 6 लाख 15 हजार 500 किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक वायडी सांळुखे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.