BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पार्थ पवार यांना निवडून आणण्याचा महिला मेळाव्यात निर्धार

0 275
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 16 गुरूद्वारा वाल्हेकर वाडी चिंचवड येथे महिलांची कोपरा सभा घेण्यात आली. महिलांनी जास्तीत संख्येने मतदान करुन पार्थ अजित पवार यांना निवडून आणायचे असा निर्धार या महिला मेळाव्यात करण्यात झाला.

चिंचवड येथे झालेल्या महिला मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग अध्यक्ष सीता जगताप, मंगल शेंडे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या शहराध्यक्षा छायावती देसले म्हणाल्या की, महिलांच्या दैनंदिन जीवनातील वाढती महागाई आणि नोंटबंदी काळातील महिलांचे कोलमडलेले आर्थिक बजेट यासाठी सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार आहे.

त्यासाठी सत्ता परिवर्तन घडवुन आणण्याचे काम फक्त महिलाच करू शकतात. त्यासाठी पार्थ पवार यांना निवडून आणून द्यायचे आहे. आपले प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी उच्चशिक्षित उमेदवाराला मत द्या असे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.