Chinchwad : राजमाता जिजाऊंमुळे स्वराज्याची स्थापना – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज –  राजमाता जिजाऊ यांनी आपल्या (Chinchwad) स्वराज्यात  सर्व जाती धर्माच्या लोकांना अत्यंत मायेने, आपुलकीने वाढवून मावळ्यांना महत्त्वाचे स्थान दिले.  रयतेला आपुलकी जिव्हाळा आणि आधार दिला. जिजाऊ शूर, बुद्धिमान, निर्भीड धैर्यशाली होत्या. त्यांच्या  महत्त्वकांक्षी नियोजनामुळेच स्वराज्याची निर्मिती झाली असे गौरवोद्गार  कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी काढले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र बांधकाम कामगार समन्वय समिती, घरेलु कामगार समन्वय समिती तर्फे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राज्यशासन कामगार भूषण पुरस्कार विजेते जयवंत भोसले,   राजू बिराजदार,कार्तिक सुतार, बालाजी बिराजदार,दत्तू बकाल,
तानाजी रुपनर,घनश्याम पैठणकर,शिवाजी भोसले,ओमप्रकाश मोरया,शकुंतला शिंदे, इंदुबाई वाघचौरे, राम जाधव आदी उपस्थित होते.

IAS : सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर बढती

स्वराज्य निर्मात्या  जिजाऊ यांचे नाव घेतलं तरी अत्यंत स्फूर्ती निर्माण होते. सर्वत्र गुलामीचा अंधार पसरलेला असताना त्यामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवण्याचे काम त्यांनी केले.  प्रतिकूल स्थितीत आपणही लढू शकतो आणि जिंकू शकतो हा विश्वास त्यांनी मावळ्यांना दिला ही स्फूर्ती घेऊन अनेक वर्षे मावळे मोघलांविरुद्ध लढले. राजमाता जिजाऊ यांनी  शिवरायांना घडवले व नातू  संभाजी राजे यांनाही घडविले, असे नखाते म्हणाले.

भोसले म्हणाले की,  शेतकरी व महिलावरील अन्याय करणाऱ्याला त्यांनी कडक शिक्षा ठोठावल्या, न्यायानिष्ठ आणि स्वाभिमानी  म्हणून रयतेला योग्य न्याय देण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनी (Chinchwad)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.