Talegaon : स्वामी विवेकानंद इंग्रजी विद्यालयात शिक्षकांचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील स्वामी (Talegaon) विवेकानंद इंग्रजी विद्यालयात शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. प्रा.अलकनंदा माताडे यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. हे शिबीर 8 ते 10 जून या कालावधीत पार पडले. उपक्रमशील वर्गांद्वारे विद्यार्थीधिष्टित शिक्षण कसे लाभदायक होईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रशिक्षणासाठी पूर्व प्राथमिक ते माध्यमिक पातळीचे साधारण 40 शिक्षक उपस्थित असून त्या सर्वानी शिक्षणाची ही नवीन शैली अगदी चांगल्या प्रकारे स्वीकारली.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये प्रा. अलकनंदा माताडे यांच्याबरोबरच अध्यक्ष रजनीगंधा खांडगे व संस्थापक संतोष खांडगे यांचा नवीन शिक्षण प्रणाली प्रती असणारा दृष्टिकोन ही खूप महत्वाचा ठरला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये  क्लील (CLIL) ही नवी संकल्पना शिक्षकांपर्यंत कशी राबवता येईल ह्या विषयी मार्गदर्शन केले.. शिक्षकांची स्वयंप्रेरणा अत्यंत महत्वाची आहे, असे पूर्ण सत्रामध्ये प्रा. अलकनंदा माताडे यांनी सांगितले.

Chinchwad : राजमाता जिजाऊंमुळे स्वराज्याची स्थापना – काशिनाथ नखाते

त्या म्हणाल्या “माझी आजची वर्गखोली उद्याचे भविष्य आहे” हा विचार करून  शिकवत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली तर भारताचे भविष्य हे अजून , उज्ज्वल होईल, पुढची पिढी ही अजून सक्षम होईल. भीती किंवा तणाव न घेता आनंददायी शिक्षण हे शाळांमध्ये  कसे मिळेल तसेच अभ्यासक्रम हा अधिक रंजक झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाशी  जोडून ठेवेल, या बाबत ही शिक्षकांना प्रशिक्षण मिळाले. त्यांनी विविध उपक्रम स्वतः घेवून कार्यशाळा खूपच आनंददायी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शमशाद शेख व शैल माताडे यांचे सहकार्य (Talegaon) मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.