IAS : सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर बढती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे सुपुत्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव आयएएस संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती झाली. भोंडवे यांनी आपल्या कार्यकाळात सहा राष्ट्रीय आणि दहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत.

 

2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या संकेत भोंडवे यांना मध्यप्रदेश केडर मिळाले. मध्यप्रदेशमध्ये विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. प्रतिभाशाली अधिकारी म्हणून एक दशकाहून जास्त काळ त्यांनी आपल्या कामाचा ठसा देशभर उमटविला आहे. तरुणांना प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास असून त्यांनी आपल्या अनेक व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या आयएएसची पाऊलवाट भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास या पुस्तकाची दहावी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे.

Maval : दुसऱ्या दक्षिण आशियाई कुंग फु स्पर्धेत मावळ मधील खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी; तब्बल 30 खेळाडूंना बक्षिसे

सध्या संकेत भोंडवे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची खासगी सचिव पदावरून संयुक्त सचिव पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक दिवंगत शांताराम भोंडवे यांचे ते ( IAS)  सुपुत्र आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.