Pune : सी एल पुलकुंडवार पुण्याचे नवे विभागीय आयुक्त;राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

एमपीसी न्यूज – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यातील (Pune)सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचाही समावेश आहे. सी एल पुलकुंडवार यांची पुणे विभागीय आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांची आयुक्त, सहकार व निबंधक, (Pune)सहकारी संस्था पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सी एल पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे अनिल कवडे यांची साखर आयुक्त पुणे येथे बदली करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची हाफकीन बायोफार्मा कॉर्पोरेशन मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली.

Pune : मेट्रोसाठी एक ऐतिहासिक क्षण ; मेट्रो धावली मुठा नदीखालून

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी के खिल्लारी यांची संचालक, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण पुणे या पदावर बदली झाली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची व्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, छत्रपती संभाजी नगर येथे तसेच प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उप विभाग, चंद्रपूर मुरुगनाथम यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळपूर उपविभाग यवतमाळ याशनी नागराजन यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.